शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा क्रुरकर्मा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:55 IST

अडिच वर्षीय श्रृतीच्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात रंगकाम करणार्‍या अटक करण्यात आली आहे. अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे असे अटक आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देरंगकाम करणारा अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे हा क्रुरकर्मा श्रुतीच्याच इमारतीत राहणारा आहे.अजयने घरात झोपलेल्या श्रुती शिवगणे या चिमुरडीचे अपहरण व बलात्कार करून निर्घृण खून केला.तपासासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांवरून १२ पथके नेमण्यात आली होती.

पुणे : घरामधून अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीचा खून करणार्‍या क्रुरकर्म्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. रंगकाम करणारा हा क्रुरकर्मा श्रुतीच्याच इमारतीत राहणारा आहे. तो २३ वर्षांचा असून मानसिकदृष्टया विकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे (वय २३, रा. धायरी गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आई वडिलांसह घरात झोपलेल्या श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) या चिमुरडीचे अपहरण केल्यावर, बलात्कार करून तिचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहाच्या दरम्यान धायरीमध्ये घडली होती. या भीषण प्रकारामुळे पोलीसही सुन्न झाले होते. तपासासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांवरून तब्बल बारा पथके नेमण्यात आली होती. यामध्ये परिमंडल दोनसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा समावेश  होता. पोलीस सर्व बाजुंनी या प्रकरणाचा तपास करत होते. आसपास राहणार्‍या अनेकांकडे चौकशी केली होती. पोलिसांच्या तपासात रंगकाम करणार्‍या या विकृताने हा घृणास्पद प्रकार केल्याचे उघडकीस आले. गेल्या तीन वर्षांपासून तो एकटाच राहत असून त्याला कोणीही नातेवाईक नाहीत. एकाच इमारतीत राहत असल्याने त्याला श्रुतीच्या कुटुंबीयांची चांगली माहिती होती. रविवारी मध्यरात्री खिडकीतून हात घालून दरवाजा उघडून त्याने श्रुतीला पळवून नेले. मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहाच्या दरम्यान घरामधून अपहरण करून खून करण्यात आला. तिचा मृतदेह सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत मिळून आला होता. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समोर आले. घटनास्थळावर आढळून आलेला श्रुतीचा मृतदेह आणि एकूणच वातावरण हृदयद्रावक होते. श्रुती रविवारी रात्री घरामधून गायब झाल्यापासून ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिचा रात्रभर शोध घेत होते. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पहाटे साडेसहाच्या सुमारास काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. पोलिसांनी शोध घेतला असता तिचे कपडे मिळाले. तेथून काही अंतरावरच श्रुतीचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याभोवती फास दिल्याचे व्रण होते. आरोपीने गळा आवळून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वडील विजय शिवराज शिवगणे (वय ३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मूळचे परभणीचे असलेले शिवगणे कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले होते. विजय वेटरचे काम करतात, तर श्रुतीची आई विद्या या भाज्या विकण्याचे काम करतात. या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पोलीसही या कुटुंबाचे दु:ख पाहून हेलावून गेले आहेत.घटनास्थळावरील हृदयद्रावक चित्र पाहून पोलीस अधिकार्‍यांनाही अश्रू आवरले नाहीत. श्रुती गायब झाली त्या रात्रीपासून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. रविवारी आणि सोमवारी दिवसभर जवळपास सव्वादोनशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या तपासाला लागले आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरामध्ये २५ जणांकडे चौकशी करण्यात आली असून सोमवारीही १५ पेक्षा अधिक संशयितांकडे चौकशी सुरू होती. सोमवारी पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे (गुन्हे) उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, पंकज डहाणे (गुन्हे), सहायक आयुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्यासह विविध पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाच्या आसपासचा परिसर पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने पिंजून काढला. खुन्याचा माग काढण्यासाठी काही धागेदोरे हाती लागतात का, हे बारकाईने तपासण्यात येत होते. त्यातूनच रंगकाम करणार्‍या या आरोपीची माहिती हाती लागली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसPuneपुणे