पुणो : शहरात डेंगीने माजविलेली दहशत मोडून काढण्यासाठी पुणो महापालिकेने विद्यार्थी-शिक्षकांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज दिवसभरात महापालिकेच्या 75 शाळांमधील सुमारे 15 हजार विद्यार्थी-शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे विद्यार्थी आता आपल्या घरासह आजूबाजूंच्या घरांमधील डेंगीच्या डासांची
उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
शहरात गेल्या 4-5 महिन्यांपासून डेंगीने थैमान घातले आहे. सप्टेंबर महिन्यात 918 रुग्ण सापडले होते. त्यामुळे या वर्षातील रुग्णांची संख्या 2 हजार 8क्क् च्या घरात पोहोचली होती. यातील काहींना जीवही गमवावा लागला होता. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि डेंगी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते तोकडे पडत आहेत. जोर्पयत नागरिकांमध्ये जनजागृती होत नाही, तोर्पयत डेंगी आटोक्यात
येईल, असे वाटत नसल्याने पालिकेने आपला मोर्चा आता जनजागृतीकडे वळविला आहे.
त्याअंतर्गत आज दिवसभरात पालिकेच्या 75 शाळांमधील सुमारे 15 हजार विद्यार्थी आणि शिक्षकांना आज प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये डासांची उत्पत्ती कशी होते, डासांच्या अळ्या कशा असतात, त्या कोठे निर्माण होऊ शकतात, ही उत्पत्ती स्थाने कशी नष्ट केली पाहिजेत, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
याबरोबर 3 लाख 4क् हजार पुणोकरांच्या मोबाईल जनजागरणपर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. पीएमपी व खासगी बसमध्ये स्टिकर्स लावण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)
च्महिला बचत गटही पालिकेच्या ‘डेंगी हटाव’ मोहिमेत सहभागी होणार आहे. काही बचत गटांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधला. बचत गटांच्या माध्यमातून शहरात रॅली काढणो, वस्तीवर महिलांच्या छोटय़ाछोटय़ा सभा घेणो आदी गोष्टी केल्या जाणार आहेत.
मनुष्यबळ वाढविले
घरोघरी जाऊन तपासणी करणो, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी पालिका सध्या ठेकेदारी पद्धतीने 217 कर्मचा:यांकडून कामे करून घेत आहे. त्यात वाढ करून हे कर्मचारी आता 32क् वर करण्यात आले आहे.
औषधाच्या फवारणीसाठी 2क्क् अतिरिक्त स्प्रे पंप
डासांच्या अळ्यांना मारण्यासाठी करण्यात येणा:या औषध फवारणीसाठी पालिकेकडून अतिरिक्त 2क्क् स्प्रेपंप भाडय़ाने घेण्यात आले आहेत. सध्या पालिकेकडे 2क्क् स्प्रेपंप आहेत. त्यात आणखी 2क्क्ची वाढ झाल्याने औषध फवारणीस चालना मिळणार आहे.