शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे ऑपरेशन वर्षा २१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. येथील परग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर सरसावले आहे. दक्षिण मुख्यालयातर्फे ऑपरेशन वर्षा अंतर्गत पुण्यातील आैंध मिलिटरी स्टेशन आणि बाॅम्बे इंजिनिअर ग्रुपचे १५ पथके रवाना करण्यात आले आहे. अन्नधान्य, आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच बचाव कार्य हे पथक राबविणार आहे.

राज्यात घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे ठाणे, मुंबई, कोकणातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या या ठिकाणी स्थानिक प्रशासन तसेच एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे. मात्र, यालाही मर्यादा येत आहे. २०१९ मध्ये सांगली येथे आलेल्या महापुरात लष्कराने मोठी मदत केली होती. त्याच पार्श्वभूमीवर वरील पूरग्रस्त जिल्ह्यात मदतीसाठी लष्कराचे दक्षिण मुख्यालय पुढे आले आहे. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन वर्षा ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातील आैंध मिलिटरी स्टेशन आणि बाॅम्बे इंजिनिअर ग्रुपचे १५ पथक पूरग्रस्त जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर अन्नधान्य तसेच वैद्यकीय सुविधांची सामग्रीही रवाना करण्यात आले आहे. हे सर्व मदत कार्य नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचले असून त्याठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या पूरग्रस्तांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

चौकट

नाैदलातर्फेही बचावकार्य सुरू

वेस्टर्न नेव्हल कमांडतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथके रवाना करण्यात आली आहे. यात नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नौदलाचे ७ पथक सध्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात बचावकार्य राबवित आहेत. आयएनएस शिक्रा येथून पोलादपूर आणि रायगड जिल्ह्यात मदत कार्य करण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. बचार कार्य करण्यासाठी या पथकांकडे रबर बोट, हेलिकॉप्टर, लाईफ जॅकेट, तसेच पाणबुडेही आहेत. अत्यंत अनुभवी असलेल्या या पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत.

कोट

राज्यात सुरू असलेल्या पूरपरिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी लष्कर सरसावले आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे बचाव कार्य सुरू आहे. यासाठी ऑपरेशन वर्षा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेसह, अन्नधान्याची मदतही पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली आहे.

- लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, प्रमुख दक्षिण मुख्यालय

फोटो : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झालेलेल लष्कराचे पथक.

फोटो : नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.