Pune: क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना
By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2024 15:45 IST2024-03-04T15:41:05+5:302024-03-04T15:45:01+5:30
याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....

Pune: क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना
पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खडकी येथील दर्गा वसाहतमध्ये राहणारा १५ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मदचे वडील शाह आलम जुमान शाह (वय ४२) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा रविवारी खडकी बाजार परिसरातील मैदानात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळताना त्याचा आरोपी मुलाशी वाद झाला. आरोपी मुलाने त्याच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि आरोपी तेथून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.