शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही म्हणून भांडण; पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 18:58 IST

वाढदिवसाला दुबईला का घेऊन गेला नाही, आणि मनासारखे गिफ्ट दिले नाही म्हणून पत्नी नाराज होती

किरण शिंदे

पुणे: वाढदिवस दुबईला साजरा केला नाही, तसेच वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट का दिले नाही या कारणावरून पती-पत्नीत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने केलेल्या माराने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. 

निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय 38) हिला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि रेणुका या दोघांचा सहा वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात पत्नी रेणुका हीचा वाढदिवस होता. वाढदिवसाला दुबईला का घेऊन गेला नाही. आणि मनासारखे गिफ्ट मिळाले नाही. म्हणून पत्नी रेणुका नाराज होती. यावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. आज दुपारी सुद्धा दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये निखिल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात देण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पत्नी रेणुका खन्ना हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू