शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांना वाढीव १० टक्के जागा देण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:10 IST

यंदाही पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे १० टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केले होते...

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेचा निर्णय : अनेक संलग्न महाविद्यालयांनी केला होता अर्ज

पुणे : प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक संलग्न महाविद्यालयांनीविद्यापीठाकडे दहा टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केला होता. त्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल चांगला लागला आहे. त्यातच पुण्यातील विविध नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. त्यामुळे दरवर्षी महाविद्यालयांकडून वाढीव जागांची मागणी केली जाते. यंदाही पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे १० टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केले होते. त्यास बुधवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यामुळे प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यापीठ परिसराच्या सुशोभिकरणावरही व्यवस्थापन परिषदेत सविस्तर चर्चा केली. पाण्याचे व्यवस्थापन, झाडे लावणे व स्वच्छता याविषयी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन ओपन जीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या एनएसएस वारीचा आढावा घेण्यात आला. तसेच वारीच्या निमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी केला.--विद्यापीठात सीएनजी बस सेवा मोफत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) च्या कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत आणि गो ग्रीन पुढाकारामुळे सीएनजीवर चालणाऱ्या दोन बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना मोफत सेवा देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आला. विद्यापीठाकडून सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसची सेवा मोफत दिली जाणार आहे.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बसची सेवा सुरू करण्याबाबत समिती स्थापन केली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार विद्यापीठात सीएनजी बसचे थांबे उभारले जाणार आहेत.--- बीटेक-एव्हीएशन अभ्यासक्रमाला मान्यता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे एम.टेक एव्हीएशन अभ्यासक्रम चालविला जात आहे. विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमास पसंती दिली जात आहे. आता बीटेक - एव्हीएशन अभ्यासक्रमास सुरू करणार असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी