साडेपाच हजार कंत्रटी शिक्षकांची लवकरच होणार नियुक्ती
By Admin | Updated: October 18, 2014 00:11 IST2014-10-18T00:11:43+5:302014-10-18T00:11:43+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार शंभरपेक्षा जास्त पट असणा:या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक व आरोग्य, कार्यशिक्षणासाठी 5 हजार 5क्5 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

साडेपाच हजार कंत्रटी शिक्षकांची लवकरच होणार नियुक्ती
ज्ञानेश दुधाडे - अहमदनगर
शिक्षण हक्क कायद्यानुसार शंभरपेक्षा जास्त पट असणा:या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक व आरोग्य, कार्यशिक्षणासाठी 5 हजार 5क्5 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. शिक्षकांना दर महिन्याला पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे.
संबंधित सर्व पदे अंशकालीन आणि कं त्रटी राहणार असून तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात 36 पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने याबाबतचे आदेश काढले असून राज्यातील जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
कला शिक्षणासाठी एटीडी, बीएफए, एएमही व्यावसायिक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी अथवा समकक्ष अर्हता, शारीरिक शिक्षण व आरोग्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता अथवा बीपीएड-बीएड, फिजीकल अथवा समकक्ष व्यावसायिक पात्रता, कार्यशिक्षणासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र अशी पात्रता आहे. राज्यात 1 हजार 835 शाळांमध्ये शंभर पेक्षा अधिक पटसंख्या असून तेथे 5 हजार 5क्5 शिक्षकांची नेमणूक होईल. सर्व शिक्षा अभियानातून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
च्मुंबईत 329, ठाणो 259, पुणो 217, औरंगाबाद 124, नाशिक 1क्9 उर्वरित ठिकाणी 65 पेक्षा कमी पदे भरली जाणार आहेत. सिंधुदुर्गात 1, गडचिरोलीत 2, धुळ्यात 3 आणि भंडा:यातील 6 शाळांमध्ये ही भरती होईल.
च्इतर जिल्ह्यात कशा प्रकारे प्रक्रिया राबविली जात आहे, त्याची माहिती घेवून नगर जिल्ह्यात भरती होईल. मात्र, त्यासाठी जिल्हाधिका:यांची परवानगी आवश्यक आहे, असे जिप शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.