शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत सहकारी कारखान्यावर राज्य बँकेचा अधिकारी नियुक्त : साखर सहसंचालकांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 11:28 IST

राज्य बँक यशवंत कारखान्याची मुख्य पतपुरवठादार असल्याने, कर्ज वसुली करणे सोपे जावे यासाठी कारखान्याचे नियंत्रण बँकेकडे देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४५ कोटींची थकबाकी असल्याने नियंत्रण राज्य बँकेकडेआर्थिक अनियमिततेमुळे यशवंत कारखान्यावर २०११ साली प्रशासकाची नियुक्ती बँकेची कर्जवसुली सुलभरित्या होण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची कारखान्यावर नियुक्ती होणे गरजेचे

पुुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अवसायकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक पी. बी. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य बँक यशवंत कारखान्याची मुख्य पतपुरवठादार असल्याने, कर्ज वसुली करणे सोपे जावे यासाठी कारखान्याचे नियंत्रण बँकेकडे देण्यात आले आहे. आर्थिक अनियमिततेमुळे यशवंत कारखान्यावर २०११ साली प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले. कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याची जमीन विकण्याचे देखील प्रयत्न झाले. मात्र, कारखाना सुरु करण्यात यश आले नाही. राज्य सहकारी बँक ही कारखान्याची मुख्य पतपुरवठादार आहे. बँकेचे सर्वाधिक ४४ कोटी ५३ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कारखान्याचे नियंत्रण राज्य बँकेकडे द्यावे अशी मागणी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजयकुमार भोसले यांनी पी. बी. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या पुर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांच्याकडे अवसायकाची जबाबदारी होती. यशवंत सहकारी कारखान्याचा संचित तोटा १३८ कोटी ४ लाख ७८ हजार रुपये इतका आहे. कारखाना २०११ पासून बंद आहे. कारखाना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करुनही त्यात यश आले नाही. राज्य बँकेचे साडेचव्वेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, त्यास अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. बँकेचे थकीत कर्ज मोठ्या प्रमाणावर असून, त्यासाठी अनुत्पादक खात्याची (एनपीए) तरतूद राज्य बँकेस करावी लागली आहे. बँकेची कर्जवसुली सुलभरित्या होण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची कारखान्यावर नियुक्ती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या अधिकाऱ्याची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

----------------------यशवंत सहकारी साखर कारखान्याला अवसायनात काढल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायलयात दोन याचिका दाखल असून, त्या पैकी एका याचिकेच्या सुनावनीत न्यायलयाने अंतरिम आदेश देत स्थिती आहे तशी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी कारखान्यावर बँकेच्या अधिकाºयाची नियुक्ती करुन कारखाना एकप्रकारे राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देऊन टाकला आहे.अ‍ॅड. योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेbankबँकMaharashtraमहाराष्ट्र