शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 8:24 PM

चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे. 

ठळक मुद्देयंदाचे १० वे वर्ष:  अंदाजपत्रकात २१ कोटी रूपयांची तरतुदभरण्यात आलेले अर्ज महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी १ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत स्विकारण्यात येणारअर्जदाराने आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची माहिती अर्जात लिहिणे आवश्यक

पुणे : महापालिकेची इयत्ता १० वी साठीची मौलाना अब्दुल कलाम आझाद व इयत्ता १२ वीसाठीची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक प्रोत्साहन शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलै ते १२ सप्टेंबर या कालावधीत आॅन लाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने डीबीटी डॉट पुणे कॉर्पोरेशन डॉट आॅर्ग या विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. त्यावर विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध होईल. आॅन लाईन अर्जाची प्रत नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयातही द्यायची आहे, अशी महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. गेल्या १० वर्षांपासून महापालिकेची ही योजना सुरू आहे. त्यात खुल्या गटात ८० टक्के गुण मिळालेल्या इयत्ता १० वीतील विद्यार्थ्याला १५ हजार व १२ वीतील विद्यार्थ्याला २५ हजार रूपये पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येतात. महापालिका शाळा, रात्र शाळा किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट १० टक्क्यांनी (७० टक्के) शिथिल करण्यात आली आहे. चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे. आॅनलाईन पध्दतीने भरण्यात आलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्जदार राहत असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाच्या ठिकाणी १ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी साडेदहा ते दुपारी १२ या वेळेत स्विकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची माहिती अर्जात लिहिणे आवश्यक आहे. बँक पासबुक, आधार कार्ड, आवश्यकतेनुसार मागासवर्गीय किंवा अपंगत्वाचा दाखला व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२०२५५०१२८४ या क्रमांकावर संपर्क साधावा. यंदा या योजनेसाठी अंदाजपत्रकात २१ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाStudentविद्यार्थीbankबँक