शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! पुणे विभागात 8 ते 10 वेळा ट्रेनच्या अपघातांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 08:57 IST

रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न

पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या दोन महिन्यांपासून घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून अपघात घडवण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून सुरू आहेत. जवळपास 8 ते 10 वेळा असे प्रकार घडले. काही वेळा ट्रेनचं इंजिनदेखील रुळांवरुन घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वेचा पुणे विभाग 600 किलोमीटरचा आहे. या विभागात गेल्या दोन महिन्यांत अनेकदा रेल्वे रुळांच्या क्रॉसिंगदरम्यान लोखंडी वस्तू आढळून आल्या. रेल्वेचा अपघात व्हावा या उद्देशानं क्रॉसिंगदरम्यान या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी आणि हातकणंगले स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांमध्ये लोखंडाचा दांडा काही दिवसांपूर्वीच आढळून आल्याचं रेल्वे प्रशासनानं आपल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त 'बिझनेस स्टँडर्ड'नं दिलं आहे. रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न समाजकंटकांकडून सुरू आहेत. मात्र रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट्सच्या सतर्कतेमुळे अद्याप कोणताही अनर्थ घडलेला नाही. कोल्हापूरसोबतच तळेगाव-कामशेत विभागातही रेल्वे रुळांमध्ये लोखंडी दांडा ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसच्या लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला, असं रेल्वेनं पत्रकात नमूद केलं आहे. त्याआधी गेल्या वर्षी 2 डिसेंबरला मध्य रेल्वेनं एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. सातारा जिल्ह्यातल्या वठारमध्ये काही मुलांनी ट्रेनचा अपघात व्हावा यासाठी रेल्वे रुळांवर लोखंडी प्लेट ठेवली होती. त्या मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्या पालकांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती रेल्वेनं या पत्रकातून दिली होती. 

टॅग्स :railwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAccidentअपघात