दौंडला मारहाण झालेल्या पोलिसाला अन्य एका पोलिसाची दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:00 IST2018-08-26T00:00:38+5:302018-08-26T00:00:53+5:30
दौंड येथे पोलिसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपीची बाजू घेणाऱ्या एका पोलिसाने मारहाण झालेल्या पोलिसाला दमबाजी केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड येथील अमजद शेख इंदापूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.

दौंडला मारहाण झालेल्या पोलिसाला अन्य एका पोलिसाची दमबाजी
दौंड : दौंड येथे पोलिसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपीची बाजू घेणाऱ्या एका पोलिसाने मारहाण झालेल्या पोलिसाला दमबाजी केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड येथील अमजद शेख इंदापूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. त्यांना मारहाण केलेल्या अल्पवयीन ३ मुलांपैकी एका मुलाचा संबंधित पोलीस नातेवाईक असल्याने त्याने दमबाजी केल्याचे त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना सांगितले. दरम्यान याप्रकरणी लेखी स्वरुपात अर्ज दाखल करण्याच्या सूचना महाडिक यांनी शेख यांना दिल्या.
याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलासह अजय जाधव (वय ४0, रा. गोवागल्ली, ता. दौैंड) याला अटक केली. न्यायालयापुढे उभे केले असता जाधवला सोमवार (दि.२७) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले. तीन अल्पवयीन मुलांना रिमांड होममध्ये पाठविणार आहेत.