शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणार्‍या गुंड बंटी पवार टोळीवर दुसरी मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 5:58 PM

बंटी पवार टोळीविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजविणे, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे

पुणे : सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणार्‍या बंटी पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय ३६), शुभम बबन वाघमारे (वय २६), प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय १९, तिघे रा. वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

बंटी पवार टोळीविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजविणे, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. २०१५ मध्य बंटी पवार आणि त्यांच्या साथीदारांवर मोक्का कारवाई केली होती. त्यानंतर तो जुलै २०१९ मध्ये जामीन मिळवून बाहेर आल. होता. त्यानंतर त्याने पुन्हा दोन खुनाचे प्रयत्न केले व पसार झाला. पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये त्याला अटक करुन येरवडा कारागृहात रवानगी केली. परंतु, कोव्हीड १९ च्या प्रार्दुभावाचा गैरफायदा घेत तो जामीनावर पुन्हा बाहेर आला. त्यानंतर २० जून २१ रोजी बंटी पवार व साथीदार शुभम वाघमारे यांना ५ लाख रुपयांचा गांजासह अटक करण्यात आली. तपासात पवारचा साथीदार ढाकणे याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 

बंटी पवार आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजूर दिली. पोलीस निरीक्षक घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, कुलदीप संकपाळ, प्रमोद कळमकर, मोहन भुरूक आदींनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ३० गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस