शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आधी सुनेचा छळ, आता व्याजाच्या पैशातून गोळीबार; उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 17:33 IST

उद्योजक पिता-पुत्रासह आठ जणांविरूद्ध चतु : शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. व्याजाने पैसे देऊन  जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून हवेत गोळीबार करत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबददल काटेनगर पिंपळे सौदागर येथील ६२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिता-पुत्रासह आठ जणांविरूद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये  दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघेही रा. औेंध) दीपक गवारे,  सोनाली दीपक गवा ((रा. डेक्कन)) राजू उर्फ अंकुश सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती) अशा आठ जणांविरुद्ध  खुनाचा प्रयत्न, महाराष्ट्र सावकारकी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली आहे.  परिसरात आरोपींची दहशत असल्यामुळे फियार्दींनी आतापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. यामधील सोनाली दीपक गवारे आणि दीपक निवृत्ती गवारे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या मुलाने आरोपी गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातून रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील जागा स्वत:चे नावावर करून घेण्यासाठी फि र्यादी व त्यांच्या मुलाला डिसेंबर २०२० मध्ये घरी बोलावले होते. त्यावेळी नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर गणेश गायकवाड व दीपक गवारे याने तरूणाच्या डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने स्टॅम्प, लिहलेले व कोरे पेपरवर सह्या घेतल्या. दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून डेक्कन येथील गवारे याच्या घरी कोंडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------गुन्ह्यातील आरोपींनी ७ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील अतोने गावातील फिर्यादी यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर नंदा गायकवाड यांचे नाव लावल्याचे नमूद असून त्याबाबत अधिक तपास करायचा आहे. घटनेच्या दिवशी दीपक गवारे याने वापरलेले पिस्तुल जप्त करायचे आहे. 

याप्रकरणात आरोपींनी विनापरवाना तसेच बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देवून फिर्यादी यांच्याकडून नियमापेक्षा जास्त व्याज व मुद्दल वसूल केली आहे. त्यांनी या स्वरुपाचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.---------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार