शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह; माजी नगरसेवकाच्या मुलाच्या कारची टेम्पोला जोरदार धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 08:02 IST

Pune News : पुण्यात पुन्हा एकदा मद्यपान करुन माजी नगरसेवकाच्या मुलाने ट्रेम्पोला जोरदार धडक दिली.

Pune Accident News : पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणानंतर मद्यपान करुन गाडी चालवून अपघात झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच पुणे शहरात एका धनधांडग्याच्या मुलाने भरधाव वेगात एसयूव्ही कार चालवून टेम्पोला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेत टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजदेखील आता समोर आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात घडला. शरद पवार गटाचे नेते आणि माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने मद्यपान करुन भरधाव वेगात एसयूव्हीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनरसह सौरभही जखमी झाल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सौरभ दारूच्या नशेत होता आणि तो राँग साईडने गाडी चालवत होता.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सौरभ गायकवाड दारूच्या नशेत असताना टेम्पोला इतक्या जोरात धडक दिली की त्याच्या गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.

टेम्पो चालक दिपक बाबुराव हिवराळे यांनी याप्रकरणी तक्रार केली असून तेच अपघाताच्या वेळी कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवत होते.  कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवत १६ तारखेला पहाटे पाचच्या सुमारात मुंढव्यावरून मांजरीकडे जात होतो. यावेळी समोरून एक गाडी येत होती. ही गाडी राँग साईडने येत होती. या गाडीने आमच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे माझ्यासोबत असलेला क्लिनर राजा शेख    असे आम्ही दोघेही जखमी झाले. समोरून येणाऱ्या गाडीचा नंबर MH12TH0505 होता आणि ही गाडीत सौरभ गायकवाड होता, असे हिरवळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हिवराळे यांच्यावर मांजरीतील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी