शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड गजानन मारणेवर वारजे पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:02 IST

सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम समाविष्ट

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोष करत जंगी मिरवणुक काढून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करणार्या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर पोलिसांनी एकामागोमाग गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. वारजे पोलीस ठाण्यात काल रात्री आणखी एक गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.तळेगाव दाभाडे, कोथरुडमध्ये गजानन मारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना त्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम समाविष्ट करण्यात आले.पुणे - बेंगलुरु महामार्गावर चांदणी चौकात १५ फेब्रुवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजता सराईत गुन्हेगार गजानन मारणे याने त्याचे साथीदार जमवून घेऊन जात असताना वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना थांबवून कोविड -१९या अनुषंगाने परवानगी घेतली का याबाबत विचारणा केली असता आरोपी संतोष शेलार याने वाहनामधून हात काढून सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना हाताने बाजूला ढकलून, नाही असा इशारा देऊन न थांबता पुढे निघून गेले. तसेच रेकाॅर्डवरील गुन्हेगार गजानन मारणे व त्याचे इतर समर्थक यांनी दहशत निर्माण करुन पुणे बेंगलुरु महामार्गावरील चांदणी चौक येथून कोथरुडच्या दिशने न थांबता निघून गेले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन कोवीड -१९ सारख्या भयंकर जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने तोंडाला मास्क न लावता सुरक्षित अंतर न ठेवा आजाराचा प्रसार करण्यास मदत केली म्हणून गजानन मारणे याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस