शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ मुलीच्या नावावर घेतली करून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:43 IST

गाडी परत मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला बंदुकीतील तीन गोळ्या हवेत झाडून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देनानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलीसह राजू दादा अंकुश आणि ड्रायव्हरवर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात तक्रारदार पुढे येऊ लागल्याने आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. गायकवाड यांनी तक्रारदाराकडून प्रतिमहिना ४ टक्के व्याजदराने दिलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच रकमेची मुददल दिली नाही. म्हणून को-या कागदावर सहया घेत त्यांची मर्सिडिज जबरदस्तीने मुलीच्या नावावर करून घेतली. रक्कम फेडल्यानंतर गाडी परत मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला बंदुकीतील तीन गोळ्या हवेत झाडून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलीसह राजू दादा अंकुश आणि ड्रायव्हरवर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे निलख येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. २०१७ ते २०२१ द़रम्यान हा प्रकार घडला. फिर्यादीला व्यवसायासाठी पैसे लागत असल्याने त्यांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून २९ लाख रूपये प्रतिमहिना ४ टक्के व्याजाने घेतले. फिर्यादी रकमेचे व्याज गायकवाड यांच्या घरी जाऊन देण्यास तयार असतानाही ते फिर्यादीच्या घरी गेले. आणि रकमेची मुददल दिली नाही म्हणून सिक्युरिटीकरिता मर्सिडीज बेंज घेऊन गेले.

फिर्यादीने सहा महिन्यांनी मुददल दिली नसल्याच्या कारणास्तव फिर्यादीला घरी बोलावून मर्सिडीजची कागदपत्रे आणि को-या टीटी फॉर्म व चेकवर २५ लाख रकमेच्या सहया घेत गाडी नावावरून देखील करून घेतली. व्याज आणि मुददल असे मिळून ३२ लाख रूपये देऊन मर्सिडिज गाडी परत घेण्यासाठी गेले असता फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने बंदुकीतील ३ गोळ्या हवेत झाडून धमकी देण्यात आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AundhऔंधCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPuneपुणे