शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजप नगरसेवक धनराज घोगरेवर दुसरा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 10:56 IST

नगरसेवकाने ठेकेदाराचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पुणे : महापालिकेतील कामे मिळवून देतो, असे सांगून ठेकेदारांकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन घेण्यासाठी भाजप नगरसेवकाने ठेकेदाराचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने लघवीचा बहाणा करुन कोर्टातून पलायन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.निखील रत्नाकर दिवसे (वय ३२, रा. घोरपडी पेठ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक धनराज घोगरे, सहदेव लक्ष्मण ढावरे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), सुरेश तेलंग, विनोद माने पाटील, अ‍ॅड. अतुल पाटील, तसेच घोगरे यांच्या कार्यालयात काम करणारे इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेत काम मिळवून देतो, असे सांगून नगरसेवक घोगरे यांनी निखील दिवसे यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. त्यांनी काम मिळवून न दिल्याने शेवटी दिवसे यांनी पैसे परत मागितले. तेव्हा घोगरे व इतर चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्याबाबत बोलण्यासाठी सहदेव ढावरे याने फिर्यादीला फोन करुन पर्वती दर्शनला बोलावून घेतले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिवसे तेथे गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यांना मोटारसायकलवरुन अ‍ॅड. अतुल पाटील यांच्या कार्यालयात नेले. तेथे अगोदरच तयार केलेल्या अ‍ॅफिडेव्हिटवर सह्या घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वापरण्यासाठी त्यांना शिवाजीनगर कोर्टात आणले.

फिर्यादी यांनी कोर्टातील नाझर यांना ते अ‍ॅफिडेव्हिट त्यांचे नाही तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी भिती दाखवून दमदाटी करुन जबरदस्तीने करुन घेतले आहे, असे सांगितले. व लघवीचा बहाणा करुन दिवसे तेथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या तावडीतून पळून गेले. दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सहदेव ढावरे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकBJPभाजपाCourtन्यायालय