संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:05 PM2020-08-23T23:05:56+5:302020-08-23T23:07:04+5:30

पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Annoying! Garbage container used for mobile tank for Ganesh Visarjan in Pune, MNS protested | संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

googlenewsNext

पुणे - कोरोनाच्या सावटाखाली होत अससेल्या गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. दीड दिवसांच्या गणेशविसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या फिरत्या हौदातील विसर्जन बंद पाडले.
यासंदर्भातील वृत्त झी २४ तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.  महानगरपालिकेने कचऱ्याचे कंटेनर विसर्जनासाठी देऊन पुणेकरांच्या भावना दुखावल्या आहेत. हे सर्व तत्काळ बंद झालं नाही तर सत्ताधाऱ्यांना घरात घुसून मारू, या प्रकाराची जबाबदारी घेत महापौरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा मनसेने पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.

Web Title: Annoying! Garbage container used for mobile tank for Ganesh Visarjan in Pune, MNS protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.