दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:20 IST2018-11-22T18:12:47+5:302018-11-22T18:20:52+5:30

दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

Announcing the exam schedule for Class X and XII | दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

पुणे- शैक्षणिक टप्प्यातील यू-टर्न असलेल्या दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्चपर्यंत असणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत चालणार आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च 2019मधील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे. 

परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात. याव्यतिरिक्त परीक्षेचं वेळापत्रक छापील स्वरूपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

Web Title: Announcing the exam schedule for Class X and XII

टॅग्स :examपरीक्षा