शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 8:37 PM

अभ्यास मंडळ सदस्य पदासाठी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक पार पडून सदस्य निवडून आले. मात्र, कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या होण्यास ८ महिन्यांचा विलंब लागल्याने अध्यक्षांची निवड होऊ शकलेली नव्हती.

ठळक मुद्दे ६ जणांची बिनविरोध तर ६ जागांसाठी निवडणूक नियमबाह्य नियुक्त्यांनी फेरयादी लावावी लागण्याची विद्यापीठ प्रशासनावर नामुष्की

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या मराठी, संस्कृत, इतिहास, संरक्षण व सामाजिकशास्त्र, विधी आणि समाजशास्त्र अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळावर निवडणूक होउन अध्यक्ष निवडून आले. अभ्यास मंडळ सदस्य पदासाठी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक पार पडून सदस्य निवडून आले. मात्र, कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या होण्यास ८ महिन्यांचा विलंब लागल्याने अध्यक्षांची निवड होऊ शकलेली नव्हती. त्याचबरोबर अभ्यास मंडळाच्या काही सदस्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य पध्दतीने करण्यात आल्याने फेरयादी लावावी लागण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली. तसेच हा नियुक्त्यांचा वाद न्यायालयात गेला आहे. यापार्श्वभुमीवर मानव विज्ञान विद्याशाखा विषयांच्या अभ्यास मंडळ निवडणुका मंगळवारी पार पडल्या. हिंदी अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भोसले, इंग्रजी अभ्यास मंडळावर एस. पी. महाविद्यालयाचे डॉ. अशोक चासकर, अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे, मानसशास्त्र अभ्यासमंडळावर डॉ. नरेंद्र देशमुख आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळावर डॉ. बाळकृष्ण कांबळे अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता कॉलेजचे प्रा. डॉ. शिरीष लांडगे पाटील, संस्कृत अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे प्रा. रविंद्र मुळे, इतिहास अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. राधिका शेषन, संरक्षण व सामारिकशास्त्र अभ्यासमंडळावर विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे, विधी अभ्यासमंडळावर यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजचे प्रा. डॉ. सोपान इवरे आणि समाजशास्त्र अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ