शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा स्मार्ट सिटीची; कामकाज मात्र जुन्याच गतीने

By admin | Updated: September 15, 2015 04:44 IST

‘स्मार्ट सिटी’ची सातत्याने घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे कामकाज मात्र त्याच त्या खास सरकारी संथगतीने सुरू आहे. प्रशासनाच्या कामकाजात जीआयएस

पुणे : ‘स्मार्ट सिटी’ची सातत्याने घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे कामकाज मात्र त्याच त्या खास सरकारी संथगतीने सुरू आहे. प्रशासनाच्या कामकाजात जीआयएस (जिआॅग्राफिकल इर्न्फमेशन सिस्टिम) या अत्याधुनिक माहिती प्रणालीची मदत घेण्यासाठी तुमच्या विभागाचा लेखी अहवाल पाठवा, हा आयुक्तांचा आदेश बहुसंख्य विभागप्रमुखांनी नजरेआड केला आहे. त्यामुळे याबाबतची निविदा गेले काही महिने महापालिकेत अडकून आहे.शहरातील किमान काही लाख मिळकतींची नोंदच नसल्याने त्यांच्यापासून महापालिकेला कसलाही कर मिळत नाही. कर संकलन विभागाला ही सर्व माहिती मिळावी यासाठी जीआयएस सिस्टिम लागू करण्यात येणार होती. मात्र, या प्रणालीची उपयुक्तता लक्षात घेऊन आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या सर्वच विभागांसाठी ही अत्याधुनिक माहिती प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. यातून सर्व विभागांच्या नोंदी अद्ययावत होऊन त्यात फसवाफसवीला वावच नव्हता. निविदा रद्द करतानाच आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व विभागांनी त्यांना या प्रणालीमार्फत कोणत्या माहितीची गरज आहे, याचा लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उद्यान विभागाने शहरातील त्यांच्या लहानमोठ्या उद्यानांच्या प्रतिमा, विद्युत विभागाने त्यांचे खांब, स्वच्छता विभागाने त्यांच्या विविध परिसरात असलेल्या कचरापेट्या अशा प्रकारची माहिती यात अपेक्षित होती. मात्र, कर संकलन विभागाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही विभागाने याबाबत कसलाही अहवाल तयार केला नसल्याचे समजते. सिटी स्मार्ट करण्याच्या मागे लागलेले आयुक्त व पूर्वीच्याच संथ गतीने कामकाज करणारे महापालिका कर्मचारी अशी विसंगती यातून उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)या प्रणालीत उपग्रहामार्फत संपूर्ण शहराचा नकाशा तयार केला जातो. त्यात प्रत्येक परिसरातील प्रत्येक मिळकतीची प्रतिमेसह नोंद होते. उपग्रहामार्फत मिळकतीची प्रतिमा मिळाली; मात्र त्याची महापालिकेकडे नोंदच नाही, अशा सर्व मिळकती या प्रणालीतून कर संकलन विभागाच्या रेकॉर्डवर येणार होत्या. प्रत्येक विभागात याच पद्धतीने काम झाले तर सर्व नोंदी अद्ययावत होतील व कसल्या फसवाफसवीला वावच राहणार नाही, यासाठी आयुक्तांनी सर्व विभागांत या प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विभागप्रमुखांचा त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने याबाबतची निविदाच प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे करसंकलन विभागासाठी काढलेली या माहिती प्रणालीची निविदा रद्द करण्यात आली व सर्व विभागांसाठी नव्याने एकत्रित निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.