शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:57 IST

येत्या ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी एका दिवसाची वाढीव मुदत

पुणे: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश फेरीच्यासाठी राबविल्या जात असलेल्या दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक माध्यमिक उच्चशिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून, येत्या ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाणार आहे. तसेच पहिल्या नियमित फरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी एका दिवसाची वाढीव मुदत देण्यात आली आहे.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या नियमित फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच विद्यार्थी , पालक व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी मुदत वाढ मिळावी, अशी विनंती शिक्षण विभागाकडे केले. त्यामुळे पहिल्या नियमित फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.      इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी नियमित फेरी ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.या फेरी अंतर्गत ४ सप्टेंबर रोजी रिक्त असलेली पदे दर्शविली जाणार आहेत. तसेच ५ सप्टेंबरपासून दुस-या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी भरलेले पसंतीक्रम बदलता येणार आहेत. तसेच ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रवेश अर्जाचा पहिला व दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येऊ शकतो. विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रातून किंवा माध्यमिक शाळांमधून अर्ज व्हेरिफाय आणि एडिट करू शकतील.दुस-या नियमित प्रवेश फेरी अंतर्गत दिल्या जाणा-या प्रवेशाची गुणवत्ता यादी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध केली जाईल. या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्या लॉगिन मधून प्रोसीड फॉर अॅडमिशन करावे लागेल.तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल.........................ज्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जायचे असेल किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, त्या विद्यार्थ्यांना विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन या सुविधेचा वापर करून अर्ज मागे घेता येऊ शकतो.विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज सिस्टीम मधून रद्द होईल. मात्र,विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून पुढे जाणे अपेक्षित आहे. जर एखाद्या विद्याथ्यार्ने चुकीने विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन बटन क्लिक केले तर अर्ज पुन्हा अन विड्रॉ करण्याची सुविधा शिक्षण उपसंचालक लॉगीन मध्ये देण्यात आलेली आहे....................प्रथम पसंतीक्रमानुसार मिळालेला प्रवेश बंधनकारक?

पहिला पसंतीक्रम निवडल्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला. तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित संधी दिली जाणार नाही. त्यांना केवळ विशेष फेरीमध्ये संधी मिळणार आहे.....................प्रवेश रद्द केल्यास काय होईल?

जर घेतलेल्या प्रवेश रद्द करायचा असेल तर विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला विनंती करून आपला प्रवेश रद्द करू शकतात.मात्र, घेतलेल्या प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे............. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या महत्त्वाच्या तारखा -  ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता दुस-या नियमित फेरीची रिक्त पदे दर्शविणे- दुस-या नियमित फेरीसाठी ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवणे- ८ ते ९ सप्टेंबर पात्र विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे- १० सप्टेबर रोजी १० वाजता दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे- १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत मिळालेला प्रवेश निश्चित करणे

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय