शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार

By श्रीकिशन काळे | Updated: May 5, 2023 13:00 IST

दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेला प्राणी गणना करण्यात येत असून बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो

पुणे : दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन विभागाकडून प्राणीगणना केली जाते. परंतु यंदा मात्र ती रद्द करण्यात आली आहे. परंतु अभयारण्यातील प्राणी गणना आज रात्री होणार आहे. केवळ वन क्षेत्रातील गणना होणार नाही. कारण तिथे पाऊस आणि ढगाळ वातावरणाचे सावट आहे. पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी ही माहिती 'लोकमत'ला दिली. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्राणी गणना करण्यात अडचणी येतात आणि योग्यप्रकारे गणना होत नाही. म्हणून वन विभागाच्या वतीने उघड्या वन क्षेत्रातील गणना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभराच्या काळात अभयारण्यामध्ये प्राण्यांची संख्या किती वाढली आणि किती कमी झाली, याची माहिती घेण्यासाठी प्राण्यांची गणना करण्यात येत असते. याशिवाय अभयारण्यात जर मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांवर काही परिणाम झाला आहे का, हे देखील अधिकाऱ्यांकडून तपासले जाते.  गेल्या महिन्याभरापासून विदर्भामध्ये आणि राज्यात इतर ठिकाणी देखील होत असलेल्या पावसामुळे प्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. मात्र आज रात्री पाच मे रोजी भीमाशंकर अभयारण्यात  प्राणी गणना केली जाणार आहे. अनेक जणांना या गणनेत सहभागी होतात. त्यांना गणनेचा आनंद घेता येतो.

दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्यात येते. बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो, त्यावेळी वनविभागाचे अधिकारी पाणवठ्यावर बसून प्राण्यांची मोजणी करतात. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या प्राणी गणनेचं प्राणीप्रेमींना मोठे आकर्षण असते. 

''भीमाशंकर अभयारण्यात आज रात्री प्राणी गणना होईल. परंतु उघड्या वन क्षेत्रातमध्ये ती रद्द केली आहे. तिथे पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.  - एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, पुणे वन विभाग''

''आमच्या जुन्नर परिसरात आज रात्री गणना होईल. अजून तरी आम्हाला रद्द झाल्याचा आदेश आलेला नाही. पण काल जुन्नरला पाऊस झाला आणि आज देखील ढगाळ वातावरण आहे. आज गणना झाली नाही तर मग पुढच्या वर्षीच् करावी लागते.  - रमेश‌ खरमाळे, वनरक्षक, जुन्नर वन विभाग''

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरforest departmentवनविभागSocialसामाजिकRainपाऊस