शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

... अन् प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 19:33 IST

चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबविली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती...

पुणे : वेळ सकाळी ६.३०... पीएमपीची बस दिवे घाट उतरत होती... बसमध्ये २० ते २५ प्रवासी असतील... निम्मा घाट ओलांडल्यानंतर एका वळणावर बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात येते... याची माहिती तो वाहकाला देतो... नंतर प्रवाशांना समजते, अन् त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो... पुढे काही कळण्याच्या आत चालक प्रसंगावधान दाखवत बसला डोंगरालगतच्या चारीत घालतो... बस थांबल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो. घाटात घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी पुरते घाबरून गेले होते.पीएमपी बसच्या ब्रेकफेलचे सत्र अद्याप थांबलेले नाही. दि. १६ ऑगस्ट रोजी बेंगलुरू महामार्गावर आंबेगाव बु.जवळ, दुसऱ्या दिवशी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गात भारती हॉस्पिटलसमोर आणि मागील आठवड्यात गुरूवारी (दि. २२) तोफखानाजवळ बसचे ब्रेकफेल झाल्याच्या घटना घडल्या. तर सोमवारी (दि. २६) दिवे घाटातच ब्रेकफेल झाले. सुदैवाने चारही घटनांमध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण घाटात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबविली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. .हडपसर आगाराची ही बस (बस क्रमांक -एमएच १२, ईक्यु ८००२) सकाळी ६ वाजता सासवड स्थानकातून स्वारगेटच्या दिशने निघाली होती. साडे सहा वाजण्याच्या सुमारास बसने निम्मा घाट पार केला होता. त्यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. अचानक एका वळणावर बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. सकाळी मार्गावर वाहनांची गर्दी नसल्याने चालकाने काही वेळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने तातडीने वाहक व प्रवाशांना याची कल्पना दिली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रवाशांना बसमधील आसनांच्या मधल्या जागेत उभे राहण्यास सांगितले. घाटातील डोंगरालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारी आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत या चारीमध्ये बस घालून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. बस चारीत गेल्यानंतर एक बाजू डोंगरावर आपटून बस थांबली. पण बसचे दरवाजे डोंगराला खेटल्याने प्रवाशांना उतरताना अडचणी आल्या. दरम्यान, या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पीएमपीच्या २-३ कर्मचाऱ्यांना खरचटले आहे. अपघाताचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलAccidentअपघात