शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

..आणि मित्राचा खून झाला उघड, मृतदेहाचे तुकडे जाळून टाकले कालव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 12:02 AM

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून दहा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून दहा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.विक्रम शेखर पिल्ले (वय २८, रा. फातिमानगर), राजु शिवाप्पा नारायण नाईक (वय ३४), संभू बाळकृष्ण थापा (वय २० दोघेही रा. बी.टी.कवडे रोड, घोरपडी), फारूक रफिक शेख (वय २६) आणि शहारूख सिकंदर शेख (वय २५, दोघेही रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिल्ले विरोधात पाच गुन्हे दाखल असून तो खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. न्यायालयाने त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बी. टी. कवडे रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही युवक कॅनॉल रोड येथे येणार असल्याची माहिती युनिट एकमधील पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी ( दि. २८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पथकाने सापळा लावून पिल्लेसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एअर गन, काडतुसे, चार कोयते, मास्क, दोरी, मोबाईल असा १८ हजार ३०० रूपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या तपासात जानेवारी २०१७ च्या दुसºया आठवड्यामध्ये आरोपींनी त्यांचा मित्र विकी रमेश पोताण (वय २५ रा. ढोबळवाडी, वानवडी) याचा खून केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, राजाराम सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.जॉकी.. ते गुन्हेगारआरोपी विक्रम पिल्ले हा हॉर्स रायडर (जॉकी) म्हणून पेसी शॉप आणि मल्लेश नरेडू या कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्यास दीड लाख रुपये वेतन होते. हॉर्स रायडिंग मध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने इंग्लंड आणि मलेशिया या देशांमध्ये काही वर्षे वास्तव्य केले आहे. मात्र, वाईट वर्तनामुळे त्याला कंपनीतून काढूले होते. त्यानंतर दोन वषार्पूर्वी त्याने वानवडी परिसरात चायनिज हॉटेल टाकले होते. केवळ सहावी पर्यंत शिक्षण घेतलेला पिल्ले सफाईदारपणे इंग्रजीत संभाषण करतो.

टॅग्स :PuneपुणेMurderखून