शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

... अन् त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली,मन सुन्नं झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:51 IST

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...!

पांडुरंग मरगजे - 

धनकवडी : चारचाकी गाडीतून पुण्याकडे निघालं होतं कुटुंब. वडील गाडी चालवत होते. तर आईसह तीन मुलींपैकी कुणी कल्पनाही केली नसेल की हा त्यांचा प्रवास अखेरचा ठरणार आहे. पानशेतकडून पुण्याकडे येणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् गाडी खडकवासला धरणात कोसळली. पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पत्नीसह तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मन सुन्नं करणारी ही घटना शुक्रवारी (दि. २ एप्रिल) दुपारी घडली. अन् विठ्ठल भिकुले यांच्या कुटुंबासह धनकवडी परिसरात एकच शोककळा पसरली. 

प्राजक्ता भिकुलेची बाल मैत्रीण असलेली पूजा कोकाटे म्हणाली, " माझी मैत्रीण ही प्राजक्ताच्या फुलासारखीच सतत हसणारी होती आणि तिच्या दोन बहिणी प्रणिता आणि वैदेही म्हणजे जणु चंपा आणि चाफेकळीच होत्या. परंतु काल त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, मन हेलावून गेले. अश्रू अनावर झाले.

प्राजक्ता माझ्या खूप जवळची मैत्रिण होती. गणपती, नवरात्र, दिवाळी असे सारे सण आम्ही एकत्रच साजरे करायचो.एकवेळ रक्ताचे नाते जवळचे नसेल इतके आमच्या मैत्रीचे नाते खूप जवळचे होते. कधी विचारसुद्धा केला नव्हता, असे काही घडेल म्हणून ! कॉलेजला जायला लागल्यापासून दोघींची मैत्री अधिक घट्ट आणि सोबत वाढली होती. सुमारे १९ आमची मैत्री होती. मोठीचा स्वभाव खूप शांत, दुसरी थोडी चंचल आणि तिसरी खूपच मस्तीखोर! डोळयासमोर अजूनही तिघींचे चेहेरे येतात. प्राजक्ताला वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन स्वतः च्या पायावर उभं राहायचं होतं, तिला छानसा व्यवसायही करायचा होता. आई वडिलांचे नाव मोठं करायचा होतं, त्यांना आधार द्यायचा होता. पण आता सारं काही अर्धवट राहिलं. या अपघातात सुदैवाने प्राजक्ताचे वडील बचावले. परंतु त्यांच्यावर दु:खाचा पहाड कोसळला आहे. 

-------------अजूनही विश्वास बसत नाही की ही घटना खरी आहे. पण दुर्दैवाने ती खरी आहे. अल्पनाताई व आम्ही लहानपणी एकाच चाळीमध्ये राहायचो. तिचा स्वभाव सगळ्यांशी मनमिळाऊ व मोकळ्या मनाने ती सर्वांशी वागायची. लहानपणापासून कष्ट करून ती मोठी झाली. घरची व स्वतःची जबाबदारी तिने घेतली. तिच्या ह्या अशा चांगल्या स्वभावामुळे ती सर्वांच्या कौतुकास पात्र होती. मयूर मसुरकर, धनकवडी.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणेFamilyपरिवार