शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आमदार कोट्यातून प्रदेश समितीवर अनंत गाडगीळ यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:54 AM

शहर काँग्रेसकडून डावलण्यात आलेल्या आमदार अनंत गाडगीळ यांनी अखेर आमदार कोट्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून आपली वर्णी लावून घेतली.

ठळक मुद्देथेट दिल्ली कनेक्शन वापरून गाडगीळ यांनी हा ताकदीचा प्रयोग केला असल्याची चर्चा आहे.गाडगीळ यांचे नाव रात्री उशिरा मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. गाडगीळ यांच्या निवडीवरून पुण्यात पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

पुणे : शहर काँग्रेसकडून डावलण्यात आलेल्या आमदार अनंत गाडगीळ यांनी अखेर आमदार कोट्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून आपली वर्णी लावून घेतली. आता शहरातील तथाकथीत पदाधिकार्‍यांना आपली ताकद कळाली कसेल, अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. थेट दिल्ली कनेक्शन वापरून गाडगीळ यांनी हा ताकदीचा प्रयोग केला असल्याची चर्चा आहे. पुण्यात भाजपावतर कायम टोकदार टीका करणारे गाडगीळ त्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून डावलण्यात आल्याने संतप्त झाले होते. काँग्रेसचे काम करणारी आमची ही तिसरी पिढी आहे. काल परवा पक्षात आलेले, राहतील की नाही, याची शंका असलेल्यांना संधी दिली जाते, अशी टीका त्यांनी केली होती.गाडगीळांना पाण्यात पाहतात ते नंतर राजकारणातून दिसेनासे होतात हा इतिहास असल्याचे विरोध कराणार्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी ठणकावून सांगितले. गाडगीळ यांचे नाव रात्री उशिरा मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. दरम्यान अजूनही राज्यातील काही जिल्ह्याची निवड बाकी असल्याचे समजते. गाडगीळ यांच्या निवडीवरून पुण्यात पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीसाठी गाडगीळ यांच्यासह अनेकजण इच्छुक असून त्यावरून पक्षात आताच रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसते आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे पराभूत उमेदवार विश्वजीत कदम यांच्या विरोधात मध्यंतरी जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणे