शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 21:05 IST

शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव-कार्यक्रम आणि कलाकारांचे प्रश्न यांचा योग्य विचार आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक आहे

पुणे : शहराच्या प्रशासनात शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण समिती, पीएमपीएमएल समिती, जिल्हा नियोजन आदी विविध महत्त्वाच्या समित्या कार्यरत असतात. मात्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील महापालिकेत आतापर्यंत स्वतंत्र सांस्कृतिक समिती अस्तित्वात नाही. महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून जोर धरत आहे.

 पुणे शहर हे केवळ शैक्षणिक किंवा औद्योगिक नव्हे, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारसाचे केंद्र आहे. पुण्याने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. नाट्य, चित्रपट, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक कलाकार पुण्यात घडले, वाढले आणि आजही येथे वास्तव्य करीत आहेत. या शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव-कार्यक्रम आणि कलाकारांचे प्रश्न यांचा योग्य विचार आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक आहे. आजच्या घडीला मुंबईप्रमाणेच पुणे शहरातही मोठ्या प्रमाणावर चित्रपट, वेब सिरीज, मालिका आणि जाहिरातींचे शूटिंग होत आहे. या शूटिंगसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, नियोजन, कलाकार आणि तंत्रज्ञांना सुविधा मिळाव्यात यासाठी देखील महानगरपालिकेत सांस्कृतिक समिती असणे काळाची गरज असल्याचे सांस्कृतिक विश्वाचे म्हणणे आहे.

पुण्यात गेल्या ७५ वर्षांत पुणे शहराने असंख्य नामवंत मराठी कलाकार, साहित्यिक, रंगकर्मी घडवले. महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेकडे नसतील एवढी नाट्यगृहे पुणे महानगरपालिकेकडे आहेत; मात्र ही वस्तुस्थिती असताना देखील आजपर्यंत पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करण्यात आलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक समितीची स्थापना करणे ही काळाची गरज आहे- बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग,

पुण्यात महापालिकेतर्फे महोत्सव, पुरस्कारांचे कार्यक्रम व्हायचे. पण आता काहीही होत नाही. पुण्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळायला हवे. नृत्यात्मक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र थिएटर असावे. सांस्कृतिक समिती सर्व कलांसह साहित्यिक, रंगकर्मी यांना सामावून घेणारी हवी- निकिता मोघे, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcultureसांस्कृतिकartकलाWomenमहिलाNatakनाटकcinemaसिनेमा