माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप

By प्रकाश गायकर | Published: May 17, 2024 05:14 PM2024-05-17T17:14:04+5:302024-05-17T17:14:20+5:30

दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले, तिथं पितळी कुलूप बसवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले

An event that blackened humanity The wife's private parts were pierced with nails and locked | माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप

पुणे : शहरातील वाकड परिसरामध्ये विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने हे अघोरी पाऊल उचलले आहे. त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ३० वर्षीय पती आपल्या २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी (दि. ११) सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पत्नीला संशयित आरोपी पतीने बेदम मारहाण केली. त्यातूनच त्याने अघोरी कृत्य केले असून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले. त्यासाठी त्याने पत्नीच्या गुप्तांगाला गंभीर इजा केली आहे. आधी ब्लेडने गुप्तांगावर वार केले. दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले. तिथं पितळी कुलूप बसवले असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या नराधम पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. हे दाम्पत्य नेपाळ येथील आहे. पती हा सुरक्षारक्षकाचे काम करतो तर पत्नी गृहीणी आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: An event that blackened humanity The wife's private parts were pierced with nails and locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.