शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:24 PM

मोर्चानंतर पाच दिवसांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मनसेला लेखी उत्तर पाठवले आहे. 

पुणे - काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून मनसेनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जे प्रश्न विद्यापीठ प्रशासन सहज सोडवू शकते, तेसुद्धा गेल्या अनेक वर्षांत सोडवले न गेल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याचं मत अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. "आम्हाला खोटी उत्तरं देऊ नका. हवं तर थोडा वेळ घ्या, पण विद्यार्थ्यांच्या समस्यांवर- मागण्यांवर खरी उत्तरं द्या" असा आग्रह अमित ठाकरे यांनी कुलगुरूंकडे धरला होता. त्यानुसार, मोर्चानंतर पाच दिवसांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मनसेला लेखी उत्तर पाठवले आहे. 

मागणी - रखडलेल्या मराठी भाषा भवनाच्या निर्मितीचे काम कधी पूर्ण होणार?उत्तर - मराठी भाषा भवनाच्या निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यामधील प्रत्यक्ष कामकाज १ मे २०२४ पासून कार्यान्वित करण्यासाठी विद्यापीठ आवश्यक पाऊले उचलत आहे. १ मे नंतर मराठी भाषा भवन आवश्यक त्या तयारीनिशी नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी उपलब्ध होईल. 

मागणी - विद्यापीठात १०००० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन वसतिगृहाची आवश्यकता आहे. नवीन वसतिगृहे कधी बांधणार?उत्तर - विद्यापीठात सध्या साधारणत: १५२० मुले आणि १५११ मुली त्यांच्या निवासाची व्यवस्था असून काही वसतिगृहे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पुढील ४-५ वर्षांमध्ये उपलब्ध वसतिगृहांची क्षमता दुपटीपेक्षा अधिक वाढवण्याचा कालबद्ध प्रयत्न आहे. 

मागणी - विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची हार्ड कॉपी मागवण्याची पद्धत बंद करा. कागदपत्रे देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करा. उत्तर - पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रक, ट्रान्सक्रिप्ट दुय्यम गुणपत्रक, इ. कागदपत्रे मिळवण्यासाठी संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली असून येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीनंतर कागदपत्रांसाठी हार्ड कॉपी मागवण्याची प्रक्रिया थांबवण्याचे प्रस्तावित केले आहे. 

मागणी - नाशिक व नगर उपकेंद्र असताना तेथील विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी पुण्यात यावे लागू नये. तिथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करा. उत्तर - विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्राचे काम वेगाने सुरू असून तेथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम प्रस्तावित करत आहोत. उपकेंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कार्यान्वित करण्यात येतील. 

मागणी - महाविद्यालयात विशाखा समित्या का कार्यरत नाहीत? त्यात विद्यार्थिनींचा समावेश करून घ्याउत्तर - विशाखा समिती स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांना स्मरणपत्रे पाठवली असून समितीचे गठन हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे करून त्याचा प्रतिपूर्ती अहवाल विद्यापीठात पाठवण्याबाबत कळवण्यात आले आहे. 

मागणी - हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणात दगड, झुरळ सापडतात, मेसमधील जेवणाचा दर्जा कधी सुधारणार?उत्तर - पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहामधील भोजनाची गुणवत्ता आणि दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आणि स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत विशेष यंत्रणा राबवत आहोत. 

मागणी - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी विद्यापीठाने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत उत्तर - ड्रग्जच्या मुद्द्यासंदर्भात विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्याकडील विद्यार्थ्यांनी ड्रग्जच्या विळख्यापासून दूर राहावे यासाठी आपापल्या पातळीवर सावधगिरीचे उपाय करून विद्यार्थ्यांसाठी जागृतीचे कार्यक्रम आणि समुपदेशाचे उपक्रम प्राधान्याने राबवण्याचे आवाहन केले आहे. 

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे विद्यापीठ प्रशासनाने मनविसेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला जाईल आणि आता यापुढे तरी विद्यार्थ्यांवरील अन्याय रोखण्याच्या दिशेने तत्परतेने पावले उचलली जातील, हीच अपेक्षा असल्याचं मनसेने पत्रावर म्हटलं आहे. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरे