शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"अमित शहांची जन्मभूमी महाराष्ट्र', फडणवीसांनी अजित पवारांची 'री' ओढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 16:12 IST

सहकारीमंत्री अमित शहांचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांच महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे.

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर अजित पवार एकत्र आले. यावेळी अजित पवार यांनी शाह यांचं कौतुक केलं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीसांनीही अजित पवारांची री.. ओढल्याचं पाहायला मिळालं.  

सहकारीमंत्री अमित शहांचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांच महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्याच कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. त्यानंतर भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची री.. ओढली. 

फडणवीस म्हणाले, अजित दादा म्हणाले की अमित भाईंचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे, कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. पण, अमित भाईंचा जन्म मुंबईतील आहे, त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असली तरी, जन्मभूमी महाराष्ट्र आहे. तर, उद्योग व्यवसायात असताना सुरूवातील त्यांनी मुंबईतच स्वत:ची फॅक्टरी त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे, त्यांची कर्मभूमी देखील काही काळासाठी महाराष्ट्र राहिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळेच, महाराष्ट्रातून गेलेल्या डेलिगेशन्सला त्यांच्याकडून कायम सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असेही फडणवीसांनी सांगितले. 

अजित पवार काय म्हणाले

देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहोचला आहे. सहकार विभागाचे देशात मोठ योगदान दिलं आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmit Shahअमित शाह