शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवली; हा तर निर्दयीपणाचा...; शरद पवार गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:36 IST

व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली सरकराने पुणेकरांची पिळवणूक थांबवावी ही नम्र विनंती

पुणे : पुण्यातील अलका चौकात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा ताफा जात असताना वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.  हा निर्दयीपणाचा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे सांगत त्यांनी व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी अशी नम्र विनंती सरकारला केली आहे. 

काल सायंकाळी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस गणेश कला सभागृहात सहकार विभागाच्या कार्यक्रमाला जाताना अलका चौकामधून गाड्यांचा ताफा गेला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेला थांबून ठेवले. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावरून जगताप यांनी व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

जगताप म्हणाले, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. याठिकाणी आम्ही लाल दिव्याची गाडी बंद करत आहोत. अशी गर्जना त्यांनी केली. पण त्याच्यानंतर व्हीआयपी कल्चर बंद झालेलं दिसलं नाही. शेवटी हा त्या सरकरचा निर्णय आहे. पण त्या कल्चर मध्ये सर्वसामान्यांचे जिणं अवघड होऊ नये. एवढीच आमची आर्त मागणी आहे. काल पुण्यात मोदी सरकारचे शिष्य देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जाण्याकरिता वेगवगेळ्या भागातून वाहतूक कोंडी करण्यात आली. ज्यामध्ये अलका चौकात रुग्णवाहिका सरकारने थांबवून ठेवली. हा निर्दयीपणाचा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्यांनी त्यांचं व्हीआयपी कल्चर जपावं. फक्त यामुळे कोणत्याही पुणेकरांचा जीव जाऊ नये याची काळजी घ्यावी. एवढीच त्यांना हात जोडून विनंती आहे. कृपया या व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी हीच नम्र विनंती जगताप यांनी यावेळी केली आहे.   

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस