निरगुडसर : बलात्काराचा गून्हा मागे घेऊन आपल्या प्रेयसिला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसिच्या मुलाची निघृणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक घटना दि. ११ ते २४ डिसेंबर २०२४ रोजी या दरम्यान काळात निरगुडसर येथे घडली आहे. २४ डिसेंबर रोजी विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेश रोहिदास जंबुकर याने बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळुन आला नाही. मात्र, काल दिनांक २४ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबुकर याने राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, आर्यन चव्हाण कुठे आहे. असा प्रश्न सर्वांना पडत होता. पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला.
पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्हीमध्ये आर्यन चव्हाण व आरोपी राजेश जंबुकर हा एका हॉटेलमध्ये ११ डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास नाष्टा करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात वेगाने तपास सुरू केला. राजेश जंबुकर याला वायफाय देणारे मदत करणारे यांना खाकी दाखवली. त्यानंतर, घटनेतील काही बारकावे व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला. आर्यन चव्हाण यांचे अपहरण करणाऱ्या आरोपीनीचे आर्यनचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजेश जंबुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.