आंबेडकर चौकात बॉम्ब नव्हे, बॅग
By Admin | Updated: July 15, 2014 04:04 IST2014-07-15T04:04:33+5:302014-07-15T04:04:33+5:30
सोमवारी सायंकाळी पावणेसातची वेळ, पोलीस नियंत्रण कक्षाला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेवारस बॅग असल्याचा फोन येतो

आंबेडकर चौकात बॉम्ब नव्हे, बॅग
पिंपरी : सोमवारी सायंकाळी पावणेसातची वेळ, पोलीस नियंत्रण कक्षाला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेवारस बॅग असल्याचा फोन येतो, काही मिनिटातच पोलिसांच्या फौजफाट्यासह बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल होवून बॅगची तपासणी करतात. बेवारस बॅगेत कपडे सापडल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडतो.
पाच दिवसांपुर्वीच पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या बाँम्बस्फोटाच्या घटनेमुळे नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत. गुप्तचर यंत्रणांनीही ‘हाय अलर्ट’ दिला आहे. अशातच नेहमीच मोठी वर्दळ असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी सायंकाळी बेवारस बॅग अढळल्याने सर्वांचीच धावपळ झाली. बाँब असल्याची अफवा पसरल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी
झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तातडीने
परिसर मोकळा केला. रस्त्यावरील वाहतूकही बंद केली. बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल झाल्यानंतर विविध यंत्रांच्या सहाय्याने बॅगची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बॅगेत कपडे सापडल्याने नागरिकांनी नि:श्वास सोडला.(प्रतिनिधी)