शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पुण्यातील अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्प गुंडाळला, कर्मचा-यांना काढून टाकल्याने तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 10:45 PM

सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले.

पुणे : सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर अॅम्बी व्हॅलीच्या संचालक मंडळाला अॅम्बी व्हॅली चालविण्याबाबत अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रकल्पच बंद करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाने घेतला. या ठिकाणी काम करणा-या अडीच हजार कर्मचा-यांपैकी तब्बल १,५७६ कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्यात आले असून त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांमध्ये सहारा समुहाकडून तब्बल ७ हजार ६२१ एकरामध्ये अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी क्रिकेटपटूंना बक्षीस म्हणून येथील घरे दिल्याने हा प्रकल्प चर्चेत आला होता. अनेक चित्रपट कलावंत, उद्योगपतींची घरे येथे आहेत.सहारा समूह आर्थिक अडचणीत सापडल्यापासून या प्रकल्पाच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली होती. सुब्रतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाच्या अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश एप्रिलमध्ये दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाला त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लिक्विडेटरने काम सुरु केल्यामुळे सर्व नफा लिक्विडेटरकडे जमा करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे संचालक मंडळांना खर्च भागविणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.येथील कर्मचा-यांचा तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. संचालक मंडळाने १,५७६ कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. उर्वरित ९२४ कामगार हे अ‍ॅम्बी व्हॅलीमुळे बाधित झालेल्या गावांमधील आहेत. त्यांनाही कमी केले जाणार असून पुढील पंधरा दिवसांचा पगार दिला जाणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर १९ आॅक्टोबरला अ‍ॅम्बी व्हॅली पूर्णपणे बंद होणार आहे.- अ‍ॅम्बी व्हॅली सिटी बंद झाली असली तरी येथे ज्यांच्या खासगी मालमत्ता आहेत ते येथे येऊ शकणार आहेत. येथील इंटरनॅशनल स्कूलही सुरू राहणार आहे. सध्या येथे ७० ते ८० विद्यार्थी शिकत आहेत.

टॅग्स :Puneपुणे