शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्टेशनबरोबरच शहरातील बसस्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, या दोन्ही घटना पुणे ...

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, या दोन्ही घटना पुणे स्टेशन परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे, पुणे स्टेशनबरोबरच शहरातील अन्य बसस्थानके, मध्यवर्ती बाजारपेठा, महत्त्वाचे चौक अशा गजबजलेल्या ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढावा तसेच पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे़

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, नगरसेविका नंदा लोणकर यांनी नुकतीच पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे़

पोलीस बंदोबस्त वाढवितानाच अशा घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी व यामध्ये स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी, असे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवेदनात नमूद केले आहे़ आजमितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावरत असताना आणि सामान्य नागरिक सण-उत्सवांची तयारी करत असतानाच या दोन्ही घटना घडल्या आहेत़ या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी अतिशय घृणास्पद कृत्य केले. त्यामुळे, प्रत्येक संवेदनशील व्यक्ती अस्वस्थ झाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी तातडीने छडा लावला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या, ही त्यामध्ये सर्वांसाठीच दिलासा देणारी गोष्ट आहे. परंतु, देशामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि नव्या पिढीच्या आकांक्षांना वाव देणारे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये अशा घटना घडणे शहरासाठी अजिबात भूषणावह नाही. असे प्रकारच बंद व्हायला हवेत आणि आरोपींच्या मनामध्ये पोलिसांविषयी जरब बसायला हवी, अशी सर्वसामान्यांची भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे़

--------------------

फोटो मेल केला आहे़