आलापी जीवनसत्त्व देणारी : वाडकर
By Admin | Updated: December 13, 2014 00:18 IST2014-12-13T00:18:30+5:302014-12-13T00:18:30+5:30
गाणो सुरात येण्यासाठी गायकाला तंतुवाद्य वाजविता यायलाच हवे. तंतुवाद्य वाजविता आले तरच सुराची साथ धरता येते. आलापी ही गायकाला जीवनसत्त्व देणारी क्रिया आहे,

आलापी जीवनसत्त्व देणारी : वाडकर
पुणो : गाणो सुरात येण्यासाठी गायकाला तंतुवाद्य वाजविता यायलाच हवे. तंतुवाद्य वाजविता आले तरच सुराची साथ धरता येते. आलापी ही गायकाला जीवनसत्त्व देणारी क्रिया आहे, असे मनोगत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘अंतरंग’ या कार्यक्रमात वाडकर यांच्याशी श्रीनिवास जोशी यांनी संवाद साधला. सांगीतिक प्रवास उलगडताना ते म्हणाले, ‘‘अखनूरमधील पं. जियालाल बसंत हे गुरू. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्या काळी शास्त्रीय संगीत शिक्षणा:याला तंतुवाद्य वाजविता यायला हवे, असा आग्रह असायचा. सुरुवातीच्या काळात तबला शिकला, नृत्यही शिकले. माङयावर बडे गुलामअली खाँ यांच्या गायकीचाच प्रभाव आहे. त्यांचीच गायकी शिकविली गेली.’’
सुरुवातीस नाटय़संगीतही गात होतो. गायकी, विचारांपेक्षा पुढे जाऊन काही करता येईल का, यादृष्टीने गायकाची तयारी व्हायची. पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्यासारख्या ज्येष्ठ गायकांना ऐकता आले. ही ज्येष्ठ मंडळी सुरांना गोंजारत बसायची नाही, तर सुराला न्याय देऊन परत समेवर यायचे.
‘मुन्नबाई’ जसे सारखे सारखे वाजवून लोकप्रिय होते तसेच शास्त्रीय संगीत ऐकून-ऐकून लोकप्रिय होते, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (प्रतिनिधी)