शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील टेकड्यांवर बांधकामाला परवानगी म्हणजे शहर व नागरिकांच्या आरोग्यावर घाला - वंदना चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:17 IST

विकास आराखड्याच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान, 90 हजारांहून अधिक लोकांनी सूचना व हरकती दाखल करून टेकड्यांवरील बांधकामास विरोध दर्शविला आहे

पुणे: "शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अगोदरच मोकळ्या जागांची कमतरता आहे. असे असताना सध्या असलेल्या टेकड्यांवर बांधकामाला परवानगी देणे शहराच्या व नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालण्यासारखे आहे. त्यामुळे शहरातील टेकड्या व जैवविविधता उद्याने (बीडीपी) ही पर्यावरणाच्यादृष्टीने अतिशय संवेदनशील आहेत. शहराचे हवामान नियंत्रित करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जनासाठी देखील टेकड्या, जैवविविधता उद्याने गरजेची आहेत. त्यामुळे महापालिकेने बीडीपी संरक्षणासाठी नेमलेल्या अभ्यासगटासमोर टेकड्यांच्या संरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडावी, अशी मागणी माजी खासदार ॲड.वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. शहरातील बीडीपीबाबत राज्य सरकारने माजी प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती केली आहे. या गटाकडून बीडीपीबाबतच्या सद्यस्थितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरही मागणी केली आहे.

ॲड. चव्हाण म्हणाल्या, विकास आराखड्याच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान, 90 हजारांहून अधिक लोकांनी सूचना व हरकती दाखल करून टेकड्यांवरील बांधकामास विरोध दर्शविला आहे. तसेच मुख्य सभेनेही त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यावरूनच पुणेकर टेकड्यांच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट होते. टेकड्यांवर झालेल्या अनधिकृत बांधकामास महापालिकेची निष्क्रियताही कारणीभूत आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेचा फटका पुणेकरांना व शहराला बसता कामा नये. यासाठी महापालिकेने बीडीपी संरक्षणासाठी नेमलेल्या अभ्यासगटासमोर टेकड्यांच्या संरक्षणासाठी ठाम रहावे.'

टॅग्स :PuneपुणेVandana Chavanवंदना चव्हाणenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNatureनिसर्गSocialसामाजिक