मित्रपक्षाचे कार्यकर्ते धमक्या देतात; हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:36 IST2024-03-05T13:36:05+5:302024-03-05T13:36:26+5:30
पत्रात म्हटले की, इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत.

मित्रपक्षाचे कार्यकर्ते धमक्या देतात; हर्षवर्धन पाटील
इंदापूर (जि. पुणे) : एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपणास तालुक्यात फिरू देणार नाही अशी धमकी देणाऱ्या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजमध्ये आल्यापासून बारामतीकर आणि इंदापूरकर यांच्यातील मतभेत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.
पत्रात म्हटले की, इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावे.