शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha 2024 : युती की आघाडी, मतांचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:36 IST

सध्या शिराेळे यांचे पारडे जड असले तरी मतांचा टक्का वाढल्याने यंदा काेण विजयी हाेणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

पुणे :शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार सिध्दार्थ शिराेळे आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यामध्ये थेट लढत झाली. गतवर्षी अटीतटीच्या लढतीत ५ हजार १२४ मतांनी दत्ता बहिरट यांचा पराभव झाला हाेता. दरम्यान, मागील निवडणुकीत ४३.८० टक्के मतदान झाले हाेते. त्यातुलनेत यंदा ५०.९० टक्के मतदान झाले असून सुमारे ७ टक्के मतदान वाढले आहे. अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजप उमेदवारांच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या शिराेळे यांचे पारडे जड असले तरी मतांचा टक्का वाढल्याने यंदा काेण विजयी हाेणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात १९९९, २००४ आणि २००९ मध्ये विनायक निम्हण यांनी विजय मिळवित हॅट्ट्रिक केली हाेती. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे विजय काळे विजयी झाले हाेते. भाजपने २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सिध्दार्थ शिराेळे यांना उमेदवारी दिली हाेती. त्यांना ५८ हजार ७२७ मते मिळाली हाेती. तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी ५३ हजार ६०३ मते घेतली हाेती. अवघ्या ५ हजार १२४ मतांनी बहिरट यांचा निसटता पराभव झाला हाेता. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांनी १० हजार ४५४ मते घेत वंचित ईम्पॅक्ट दाखवून दिला हाेता. तर यंदाही काॅंग्रेसचे बंडखाेर मनीष आनंद यांनी अपक्ष निवडणूक लढविली. ते किती मतदान घेतात? यावर काॅंग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित हाेणार आहे.भाजपतर्फे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सिध्दार्थ शिराेळे यांना पुन्हा संधी दिली आणि शिराेळे यांनी पूर्ण ताकदीने शिस्तबध्द प्रचाराला सुरुवात केली. मात्र, काँग्रेसतर्फे दत्ता बहिरट यांचे नाव शेवटच्या दिवशी जाहीर केले. त्यात बहिरट यांची तब्येत बरी नसल्याने ते तीन ते चार दिवस उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल हाेते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदारसंघात फिरून प्रचार करता आला नाही. दरम्यान, याच कालावधीत काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक खडकी कंटाेन्मेंट बाेर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंडखाेरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे मताचा टक्का वाढला तरी काँग्रेस उमेदवार बहिरट यांना मतविभाजनाचा फटका बसू शकताे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024shivajinagar-acशिवाजीनगरBJPभाजपाcongressकाँग्रेस