शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुण्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे तीनही कार्यक्रमात मौनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 12:30 IST

पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या पाण्याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.

ठळक मुद्देपुणेकरांचा पाणीप्रश्न  अधातंरीचउपमहापौरांचे ‘पुण्याचा पाणी पुरवठा सध्या आहे तितकाच ठेवावा’ अशी मागणी करणारे पत्रजलसंपदाकडून पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम

पुणे : पुण्याचे पाणी कमी होऊ देणार नाही असे आश्वासन महापालिका पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या त्यांच्या तीनही जाहीर कार्यक्रमात पुण्याच्या पाण्याविषयी मौनच बाळगले. महापौर व अन्य पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे या कार्यक्रमांना अनुपस्थितच होते. पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘पुण्याचा पाणी पुरवठा सध्या आहे तितकाच ठेवावा’ अशी मागणी करणारे पत्र नळस्टॉप चौकातील कार्यक्रमात दिले, पण या पत्राचे उत्तर त्यांनी काय दिले ते समजू शकले नाही. जलसंपदाने पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम ठेवली आहे. सध्या रोज १३५० दशलक्ष लिटर पाणी मिळते आहे. तरीही ते सलग ५ तास एकवेळ द्यावे लागते. तेही अनेक भागात नियमित मिळत नाही. दररोज ११५० दशलक्ष लिटर पाणीच देणार असे जलसंपदाचे म्हणणे आहे. तसे झाले तर पुणे शहराला तेवढे पाणी पुरवताना महापालिकेची ओढाताण होणार आहे.त्यामुळेच महापालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुण्याचा पाणी पुरवठा आहे तेवढाच ठेवावा अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याच्या पाण्यात कपात होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर जलसंपदा खात्याच्या सचिवांशी फोनवर चर्चा करून त्यांना तसा आदेश काढायलाही सांगितले होते. पण आता त्याला पंधरापेक्षा जास्त दिवस झाले तरीही जलसंपदाला असा आदेश मिळालेला नाही. तोंडीही कोणी काही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे फक्त ११५० दशलक्ष लिटरच पाणी दररोज घ्या असा तगादा लावला आहे.पुण्यात शुक्रवारी झालेल्या तीन जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील अशी पुणेकरांची अपेक्षा होती. त्यातही बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करताना ते यावर भाष्य करतील असे बोलले जात होते. मात्र तिथेही त्यांनी निराशा केली. त्यानंतर नळस्टॉप येथे मेट्रो व महापालिका यांच्या संयुक्त कार्यक्रमात उड्डाणपुलाचे भूमीपूजन करत असतानाही त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. याच कार्यक्रमात उपमहापौर डॉ. धेंडे यांनी त्यांना पाणी पुरवठा सध्या आहे तेवढाच कायम ठेवावा अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यांंंनी कपात होणार नाही असे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणी