पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’; तरीही पुणेकरांच्या माथी एक दिवसाची पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 09:45 PM2020-09-11T21:45:46+5:302020-09-11T21:46:41+5:30

ऐन पावसाळ्यात पाणी कपात मारली जाणार..

All four dams supplying water to Pune are 'full'; One day's water cut over Punekar | पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’; तरीही पुणेकरांच्या माथी एक दिवसाची पाणीकपात

पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’; तरीही पुणेकरांच्या माथी एक दिवसाची पाणीकपात

Next
ठळक मुद्दे महापालिकेकडून कपातीचे नियोजन

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’ झालेली असतानाच पुणेकरांच्या माथी मात्र ऐन पावसाळ्यात पाणी कपात मारली जाणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला असून पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडले जाणार नाही. या निर्णयामुळे सिंहगड रस्त्याचा बहुतांश भाग, सहकारनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज गाव, पद्मावतीनगर, आंबेगावासह (खु) परिसरातील पाणी पुरवठा बाधित होणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून वडगाव जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत पाणीकपात केली जात आहे. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गणेशोत्सवात या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न पालिकेने केला होता. पुन्हा जुन्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील महिना-सव्वामहिना अशा प्रकारे पाणी पुरविले जाईल. त्यानंतर तो पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले. खडकवासला धरण साखळीतील धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणेकरांना रोज पुरेशा दाबाने पाणी मिळण्याची आशा आहे.
=====
या परिसरांमधील पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी 30 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.  येत्या 1 ऑक्टोबरपासून या पाणीपुवठा सुरळीत होईल, असे पावसकर यांनी सांगितल
 

Web Title: All four dams supplying water to Pune are 'full'; One day's water cut over Punekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.