शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पूर्व भागातील गर्दी,गोंधळ अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा दुकानांच्या वेळेनेच; सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 13:42 IST

दोन तासांऐवजी २४ तास खुली ठेवावी मागणी...

ठळक मुद्देपूर्व भागातील जनजीवन विस्कळीत

पुणे: कोरोना विषाणूला प्रतिबंध व्हावा म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुर्व भागात दुकाने दोनच तास खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या भागातील मानसिकता लक्षात घेता दुकाने दोन तासांऐवजी २४ तास खुली ठेवा अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.काही मिळत नाही किंवा फक्त याच वेळेत मिळणार आहे म्हटले की झुंबड करून ते खरेदी करण्याकडे या भागातील बहुसंख्याकांचा कल आहे. त्यामुळेच दुकाने फक्त दोनच तास खुली राहणार, रेशनिंग वर धान्य फुकट मिळणार असे समजल्यावर गर्दी करून खरेदी केली जात आहे. त्यातच प्रशासानाने फक्त जीवनावश्यक वस्तू व त्याही दोनच तिस मिळतील असे जाहीर केल्यावर त्या दोन तासात सर्वच पुर्व भागात दुकांनांमध्ये गर्दी ऊसळली.त्यामुळेच आता या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दुकाने २४ तास खुली ठेवण्याची मागणी करत आहेत. कसबा पेठेतील क्रुष्णा दुध डेअरीचे संचालक सुनिल व प्रकाश कोकाटे म्हणाले, प्रशासनाला या भागाची मानसिकता माहिती नाही. मिळत नाही म्हटले की ते आपल्याला मिळालेच पाहिजे, इतरांपेक्षा लवकर मिळाले पाहिजे अशी इर्शा जागी होते. सगळे घरच मुलांसह रांगा लावण्यासाठी बाहेर पडते. एका घरातील तीनतीन लोक दोनदोन दुकांनांसमोर रांगा लावतात. हे बंद करायचे असेल तर दुकाने कमी वेळेऐवजी जास्त वेळ खुली ठेवावीत. कधीही मिळते म्हटले की लोक वेळ होईल तसे जाऊन खरेदी करतील.

याच पूर्व भागात गेली २५ वर्षे सामाजिक काम करणारे रिक्षा पंचायतीचे नितीन पवार म्हणाले, प्रशासन या भागात चुकीच्या पद्धतीने ऊपाय राबवत आहे. दुकाने दिवसभर खुली ठेवावीत व प्रत्येक परिसराला दिवसाच्या काही वेळा निश्चित करून द्याव्यात. म्हणजे गर्दी होणार नाही. प्रशासनाच्या या ऊपायांमुळे इथल्या लोकांना जगणे अवघड झाले आहे. दूध किंवा धान्य मिळाले नाही, दळण मिळाले नाही तर खायला काय करून घालायचे असा प्रश्न महिला वर्गासमोर आहे. पुरवून पुरवून तरी किती दिवस खाणार. संपले की हालचाल करावीच लागणार आहे, तर साठा करून ठेवण्याची मानसिकता आहे. त्याला आवर घालायचा तर इथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या गरजेनूसार प्रशासनाने काम करावे. त्यांचा ऊद्देश अर्थातच योग्य आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अयोग्य सुरू आहे असे पवार म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका