शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 18:50 IST

जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले

आळंदी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आळंदीत लक्ष्मीमाता चौकाजवळील पाण्याच्या टाकीवर एक आंदोलक चढला. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी लातूर येथील एका माजी सरपंचाने आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यात त्या व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आपण आहुती देत असल्याची चिठ्ठी लिहिली होती.           त्यानंतर आळंदी येथे रविवारी (दि.२९) आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी येथील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर ही घटना घडली. श्रीकांत काकडे हा तरुण हातात ‘एक मराठा, लाख मराठा मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेला फलक घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर जात असताना तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी हे पाउल उचलले असल्याचे म्हटले आहे. श्रीकांत याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, हे सरकार मराठ्यांना वेशीला टांगत आहे. मराठ्यांना आत्महत्या करण्यास हे सरकार प्रवृत्त करीत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे.               एकीकडे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तरुणांच्या भावना तीव्र होत आहेत. सरकारने याची त्वरित दखल घेतली पाहिजे. आरक्षण दिले नाही तर मराठा समाज या नेत्यांना फिरू देणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान पोलीस व स्थनिकांच्या प्रयत्नांनी तरुणाची समजूत काढून त्याला सुरक्षित खाली उतरविण्यात यश मिळाले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन