शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:39 IST

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक

आळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी गतवर्षीप्रमाणेच परंपरेचे पालन करून बसने पूर्ण होणार आहे. असा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे आळंदी ग्रामस्थांकडून स्वागत होत असून घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे.

२ जुलैला तीर्थक्षेत्र आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी दिली आहे. तर मानाच्या दहा पालख्यांसाठी ५० जणांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक पालखीला दोन बसेस याप्रमाणे एकूण दहा पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वारीसंदर्भातील अधिक विस्तृत आदेश शासन लवकरच काढणार आहेत. 

यापार्श्वभूमीवर यंदाही माऊलींची पालखी (चलपादुका) बसमधूनच पंढरपूरकडे जाणार आहे. वारी संबंधित घटक व मर्यादित वारकऱ्यांव्यतिरिक्त इतर वारकरी प्रस्थान सोहळ्याला तसेच दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

यंदा आषाढी वारीसाठी संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर - अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर), संत चांगटेश्वर महाराज (सासवड) या दहा मानाच्या पालख्या पंढरीला विठुचरणी जाणार आहेत.

" आषाढी वारी संबंधित सर्व घटकांशी तसेच वारकऱ्यांची मते देवस्थानने जाणून घेऊन प्रशासनाकडे मांडली होती. राज्यसरकारने सर्व घटकांचा विचार करून वारी संदर्भातील निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदाय हा कधी एकट्याचा विचार करत नाही. वारकरी संप्रदाय समाजाचे हित सांभाळतो. प्रस्थान संदर्भातील अधिक तपशीवार नियोजन लवकरच देवस्थान ठरवील. प्रथेप्रमाणे नियोजित तारखेलाच माऊलींचे प्रस्थान होईल.                                       - डॉ.अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी.

" राज्य शासनाने यंदाची आषाढी वारी गतवर्षी प्रमाणे बसने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आळंदीतील मानकरी म्हणून आम्ही स्वागत करतो. कोरोनाला कायमस्वरूपी संपवायचे असेल तर अशाच कौतुकास्पद निर्णयाची गरज होती.                                    - पांडुरंग कुऱ्हाडे, मानकरी आळंदी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuदेहूAlandiआळंदीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी