शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 14:30 IST

वारीतून वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, मतदान हक्क बजवा आदी सामाजिक विषयावर जनजागृती

बी.एम. काळे

जेजुरी : जगात अशक्य असे काहीच नाही असे आपण म्हणत असतो, मात्र ते शक्य करण्याबाबत मात्र आपली नेहमी उलटी चाल असते. म्हणने सोपे असते, करणे अशक्यप्राय वाटते, मात्र यंदा आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर आज असा एक उंचापुरा, बलदंड देहयष्टी असणारा, एम ए.( समाजशास्त्र ) उच्च शिक्षित,  अगदी कानाच्या पाळीपर्यंत पोहोचलेल्या कल्लेदार मिशांचा मुसाफिर आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी करतोय.  होय, उलटे पायी चालत तो वारी करतोय, त्याचे नाव आहे बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड, ( वय ५५ वर्षे)  रा. फुरसुंगी, पुणे. आज त्याने जेजुरी ओलांडून निरेकडे प्रस्थान ठेवलेय. 

आयुष्यात काहीतरी करायचे असे अनेकांना वाटत असते. त्यानुसार प्रयत्न ही सुरू होतो, मात्र पुन्हा तर अर्धवट राहते. मात्र या अवलियाने वयाच्या १६ व्या वर्षांपासून वारी सुरू केली आहे. पंढरीची वारी त्यासाठी आषाढी एकादशीच हवी असे नाही तर जेव्हा जेव्हा मनात येईल की आता आपण जनजागृतीसाठी बाहेर पडायला हवे, तेव्हा तेव्हा हा अवलिया घराबाहेर पडून उलटी पायी चालत वारी सुरू करतो. आजची त्याची ही ४३ वी वारी आहे. 

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, आरोग्य आणि स्वच्छता पाळा, मेरा देश मेरा परिवार या न्यायाने जगा, जगताना मतदान मात्र जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा ते करा. मतदान हा हक्क बजवायला विसरू नका आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यासाठीच ही वारी करीत असल्याचे गुंड सांगतात. देवाची भक्ती करतो,तेवढ्याच मनोभावे भारत मातेची ही भक्ती करण्याची शिकवण आपल्या जनजागृती वारीतून देणाऱ्या बापूराव गुंड यांनी आजपर्यंत आपला फुरसुंगी येथील छोटासा कपड्याचा व्यवसाय सांभाळता सांभाळता जनजागृतीसाठी पुणे ते जंतर मंतर दिल्ली अशी २०१७ आणि २०२२  असे दोनवेळा वारी केलेली आहे. मुंबई मंत्रालयापर्यंत ६ वेळा, शिखरी काठ्यांच्या यात्रेत ६ वेळा, यावर्षी  नवरात्रात दरवर्षी पुणे ते तुळजापूर अशी वाऱ्या केल्या आहेत. 

उलटे चालत वारी करताना त्यांच्या विलक्षण पेहरावा कडे पाहून कुतूहलाने प्रवाशी त्यांच्या संपर्कात येतात. ,बोलतात यातून परिणामकारक जनजागृती होत आहे. या अनेक वाऱ्यातून त्यांनी अपघात का आणि कशामुळे होतात याचे अनेक अनुभव घेतले आहेत.  लोकमत च्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे एकच विनंती केली आहे. ' सरकार, अपघात रोखण्यासाठी रस्त्यांची करोडो रुपये खर्च करून कामे करतात. पण अपघात थांबले नाहीत. शासन अपघात रोखण्यासाठी काम करते की घडवण्यासाठी काम करते. हेच समजत नाही. शासकीय प्रतिनिधींनी खरेच अपघात रोखण्यासाठी काम करीत असतील तर मला जरुर भेटावे. वस्तुस्थिती मी सांगेन असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022environmentपर्यावरणSocialसामाजिकGovernmentसरकार