शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पुणे मेट्रोच्या चारही मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत अजित पवार यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 20:35 IST

पुणे मेट्रो आता पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो नावाने ओळखली जाणार

ठळक मुद्देराज्य शासनाकडून देणे असलेले २०० कोटी रूपयेही तात्काळ दिले जाणार हिंजवडी ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाचाही विस्तार करण्याबाबत सूचना

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या चार मेट्रो मार्गांचा विस्तार करून त्याची उपयुक्ता अधिक करावी, तसेच पुणे मेट्रोचे नाव बदलून ‘पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेत याबाबतच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण व शासनातर्फे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा व प्रकल्पांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. यावेळी त्यांनी, महामेट्रो व पीएमआरडीएतर्फे साकारण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण करावे असे सांगितले. यामध्ये महामेट्रोतर्फे सुरू असलेला वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत,पिंपरी ते स्वारगेट मार्ग निगडी ते कात्रजपर्यंत व शिवाजीनगर न्यायालय ते हडपसरपर्यंतचा मार्ग हडपसरऐवजी लोणी काळभोर (कदमवाकवस्तीपर्यंत) वाढविण्यात यावा अशी सूचना केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. मेट्रोची जलद गतीने सुरू असलेली कामे पाहता महामेट्रोला राज्य शासनाकडून देणे असलेले २०० कोटी रूपयेही लागलीच दिले जाणार असून, विकास कामांकरिताचा राज्य शासनाच्या हिश्शाचा निधी त्या-त्या वर्षीच दिला जाईल याची खबरदारी मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने घेईल असेही ते म्हणाले. पीएमआरडीएमार्फत साकारण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाचाही विस्तार करण्याबाबत पवार यांनी पीएमआरडीएला सूचना दिल्या. हा मार्ग हिंजवडी ऐवजी माण पिंरगुटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.तसेच शिवाजीनगर ते माण हिंजवडी असे या मेट्रो मार्गाचे आता नाव राहणार आहे. शहरात सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करून, नव्याने आखणी करण्यात आलेले प्रकल्प चार वर्षात पूर्णत्व:ला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील रिंग रोड लक्षामध्ये घेऊन हे काम पूर्ण झाले पाहिजे. मेट्रो प्रकल्पासाठीची आवश्यक शासकीय यंत्रणा बाधित न होण्याच्या सूचना व त्यासाठीचे प्रस्ताव तसेच वित्तीय तरतूद यांचे नियोजन महाआघाडी सरकारमधील सर्वांशी चर्चा करून उपलब्ध करून देणार आहोत. पुणेकरांच्या हिताचा व भविष्याचा विचार करता हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा मला विश्वास असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो मार्गातील जमिनी या पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोAjit Pawarअजित पवारGovernmentसरकार