शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे राजकीय कसब पणाला

By admin | Updated: March 18, 2015 22:59 IST

नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत.

बारामती : नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल आणि शेतकरी कृती समिती पुरस्कृत सहकार बचाव पॅनलमध्ये होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण यांनी ९ उमेदवारांचे पॅनल आज अचानक जाहीर केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत काकडे विरुद्ध पवार गटामध्ये चुरशीची लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमेश्वर कारखाना १९९२ साली काकडे गटाकडून ताब्यात घेताना अजित पवार यांनी काकडे यांच्यातच सत्तासंघर्ष लावून दिला. प्रमोद काकडे, सतीश काकडे, शहाजी काकडे यांना वेगवेगळ्या वेळी बरोबर घेऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली. सोमेश्वर कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. प्रतापगड कारखाना सोमेश्वरने चालविण्यास घेतला. तेव्हापासून विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, शैक्षणिक संस्था सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केलेल्या कारखान्याला आर्थिक घरघर लागली. ऊस दर देताना देखील अडचणी आल्या. गैर व्यवहार प्रकरणे पुढे आली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीला पहिला धक्का बसला. निवडणुकीच्या सुरुवातीलाच काकडे-पवार यांच्यातील वाक्युद्ध रंगू लागले आहे. शहाजी काकडे यांनी थेट कोणाच्या बाजुने जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सोमेश्वरच्या अगोदर माळेगाव कारखान्याची निवडणूक होणार आहे. माळेगाववर वर्चस्व गाजविलेली चंदरराव तावरे, रंजन तावरे ही जोडगोळी पुन्हा एकत्र आली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घरनिहाय ऊस उत्पादकांची माहिती असलेल्या तावरे यांचे आव्हान पेलण्यासाठी अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. उमेदवारी देताना जातीय समीकरणावर भर दिला. त्याचबरोबर तावरे यांच्या बाजुने झुकलेल्या मंडळींच्या घरातीलच काही लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे कौटुंबिक कलह काही ठिकाणी निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आंदोलने बारामती सलग दोन वर्ष झाली. सत्तास्थानावरच घाव घालण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही उमेदवार रिंगणात राहिले. त्यांना बरोबर घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ९ उमेदवारांचा पॅनल जाहीर केला. सहकार बचाव पॅनलच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला. आम्ही सुचविलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या ९ जणांना घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविली जात असल्याचे ढवाण यांनी सांगितले. स्वाभिमानीच्या या ९ उमेदवारांचा त्रास कोणाला होणार, याची चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री पदावर नसताना अजित पवार यांना विरोधकांबरोबरच पक्षातील मंडळींनी आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय कसब या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.४विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे. मात्र, अजित पवार यांना त्यांच्या ताब्यातील कारखाने बिनविरोध करणे शक्य झाले नाही. ४किंबहुना अगदी बारामती सहकारी बँकेची निवडणूक देखील बिनविरोध झाली नाही़ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या बरोबर मागील १५ वर्षांपासून विविध पदांवर काम केलेल्या मंडळींनी नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा उगारला. त्यामुळे सत्तांतरानंतर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अजित पवार यांच्यावर ‘ताक’ सुद्धा फुंकुन पिण्याची वेळ आली आहे.