शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; बारामती आणि शिरूरबद्दलही सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 15:31 IST

अजित पवार यांनी सूचक भाष्य करत बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत: आणि महायुतीतील इतर घटकपक्षांचे महत्त्वाचे नेते २८ मार्च रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे सर्व जागांवरील उमेदवार घोषित करतील, अशी माहितीही अजित पवारांकडून देण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नक्की कोण निवडणूक लढवणार, याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मागील काही दिवसांपासून प्रचार करत आहेत. मात्र महायुतीकडून धक्कातंत्राचा अवलंब करत इथून रासपच्या महादेव जानकर यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत अजित पवार यांनी सूचक भाष्य करत सध्या मी बारामतीचा सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनात जे नाव आहे, तीच व्यक्ती बारामतीतून उमेदवार असेल, असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिरूरमध्ये पक्षप्रवेशानंतर तेथील उमेदवाराच्या नावाची घोषणा करू, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हेच शिरूरमधून महायुतीचे उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामतीraigad-pcरायगडshirur-pcशिरूर