शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:04 IST

अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला

बारामती: एक तरी वारी अनुभवावीमुखी घ्यावे नाम पांडुरंगाचे पंढरीची वारी म्हणजे एक समृध्द करणारा अध्यात्मिक अनुभव. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातून पांडुरंगाची कृपा अनुभवण्याची संधी मिळतेय हे केवढं मोठं साैभाग्य,अशा भक्तीभावाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच बारामती ते काटेवाडी सपत्नीक पायी वारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि ७) सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.तसेच टाळ  हाती घेत  विठुनामाचा गजर केला.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

शहरातील मोतीबागेत  पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवार यांनी सपत्नीक  वारीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.यावेळी पवार यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी, तसेच  हस्तांदोलन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. यावेळी मार्गावर काही काळ उपमुख्यमंत्री पवार यांनी पालखी रथाचे काही काळ सारथय केले.दरम्यान, मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

तुच माझा विठ्ठल ..तुच माझा पाठीराखा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला भक्तीभावाने साद घातली.आज वारीत दंग होवुन वारकर्यांसोबत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख समृध्दीसाठी पवार यांनी साकडे घातले.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारPandharpurपंढरपूरBaramatiबारामती